Tuesday, October 17, 2023

व्हिडिओ # 624 : वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा (ले. श्रीकांत बोजेवार उर्...


मराठीतले एक नामवंत लेखक, कवी, समीक्षक आणि पत्रकार श्रीकांत बोजेवार उर्फ तंबी दुराई यांची ही बोचरी आणि उपरोधिक कविता. 15 आक्टोबर 2023 च्या म.टा. च्या संवाद पुरवणीत प्रसिद्ध झालेली. हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो. मात्र पुस्तके, वाचन, लेखन या विश्वात सध्या काय परिस्थिती आहे याची सद्यस्थिती आपल्या टोकदार शैलीत आपल्याला दाखवून देणारी श्रीकांतजींची ही कविता त्यांच्या आणि म.टा. च्या सौजन्याने आपल्यासाठी सादर करीत आहे. कशी वाटली ते अवश्य कळवा.

1 comment:

Anonymous said...

विकास, कवींच्या शब्दातील भावना अत्यंत चपखलपणे व तितक्याच उपहासाने ऐकण्याचा आनंद मिळवून दिल्याबद्दल मनस्वी अभिनंदन ! पद्माकर पाटील देवळी तालुका चाळीसगाव