Monday, October 30, 2023

व्हिडिओ # 628 - तथास्तु (ले. गुरुनाथ तेंडुलकर)


गुरुनाथ तेंडुलकर यांचा रविवारच्या प्रहारच्या अंकात (29 आक्टोबर 2023) प्रसिद्ध झालेला एक प्रेरणादायी लेख सादर करीत आहे. यापूर्वी मी गुरुनाथ तेंडुलकरांचा 'वेळ मिळत नाही' आणि 'माझा काय संबंध? हे लेख वाचले होते, हे आपल्याला आठवतच असेल. जर आपण ते लेख ऐकले नसतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी मी दिली आहे. त्या लेखाप्रमाणेच हाही लेख तुम्हाला आवडेल याची खातरी आहे. लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा.

Monday, October 23, 2023

व्हिडिओ # 627 - माझा काय संबंध ? (ले. गुरुनाथ तेंडुलकर)


गुरुनाथ तेंडुलकर यांचा रविवारच्या प्रहारच्या अंकात (23 आक्टोबर 2023) प्रसिद्ध झालेला एक प्रेरणादायी लेख सादर करीत आहे. यापूर्वी मी गुरुनाथ तेंडुलकरांचा 'वेळ मिळत नाही' हा लेख वाचला होता, हे आपल्याला आठवतच असेल. जर आपण तो लेख ऐकला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी मी दिली आहे. त्या लेखाप्रमाणेच हाही लेख तुम्हाला आवडेल याची खातरी आहे. लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा.

Friday, October 20, 2023

डॉ. सीताराम जाधव (कन्नड) यांच्या सफरचंद बाग आणि गोशाळेस भेट


आमच्या चाळीसगावाजवळील कन्नड येथील एक अभ्यासू आणि प्रगतीशील शेतकरी डॉ. सीताराम जाधव यांनी खडकाळ व बरड जमिनीवर चक्क सफरचंदांची लागवड केली आहे. ती बघण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो त्याचा हा व्हिडिओ. आम्ही गेलो तेंव्हा डॉ. जाधव यांच्याकडे म.प्र. तून सुप्रसिद्ध कृषि तज्ञ ताराचंद बेलजी हे आलेले होते आणि त्यांची कार्यशाळा आयोजित केलेली होती. त्यामुळे डॉ. जाधव यांच्याशी मोजकेच संभाषण होवू शकले. तरी पुढे कधीतरी पुन्हा आम्ही जाऊ आणि त्यांच्याशी सविस्तर बोलून त्यांच्या प्रयोगाची माहिती घेऊ. तोवर हा एक ट्रेलर आहे असे समजावे. #applegarden #kannad #farming #applefarming #goshala #cowfarming #drseetaramjadhavkannad #drjadhavkannad

व्हिडिओ # 625 डॉ. सीताराम जाधव यांच्या सफरचंद बाग आणि गोशाळेस भेट


आमच्या चाळीसगावाजवळील कन्नड येथील एक अभ्यासू आणि प्रगतीशील शेतकरी डॉ. सीताराम जाधव यांनी खडकाळ व बरड जमिनीवर चक्क सफरचंदांची लागवड केली आहे. ती बघण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो त्याचा हा व्हिडिओ. आम्ही गेलो तेंव्हा डॉ. जाधव यांच्याकडे म.प्र. तून सुप्रसिद्ध कृषि तज्ञ ताराचंद बेलजी हे आलेले होते आणि त्यांची कार्यशाळा आयोजित केलेली होती. त्यामुळे डॉ. जाधव यांच्याशी मोजकेच संभाषण होवू शकले. तरी पुढे कधीतरी पुन्हा आम्ही जाऊ आणि त्यांच्याशी सविस्तर बोलून त्यांच्या प्रयोगाची माहिती घेऊ. तोवर हा एक ट्रेलर आहे असे समजावे.

Tuesday, October 17, 2023

व्हिडिओ # 624 : वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा (ले. श्रीकांत बोजेवार उर्...


मराठीतले एक नामवंत लेखक, कवी, समीक्षक आणि पत्रकार श्रीकांत बोजेवार उर्फ तंबी दुराई यांची ही बोचरी आणि उपरोधिक कविता. 15 आक्टोबर 2023 च्या म.टा. च्या संवाद पुरवणीत प्रसिद्ध झालेली. हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो. मात्र पुस्तके, वाचन, लेखन या विश्वात सध्या काय परिस्थिती आहे याची सद्यस्थिती आपल्या टोकदार शैलीत आपल्याला दाखवून देणारी श्रीकांतजींची ही कविता त्यांच्या आणि म.टा. च्या सौजन्याने आपल्यासाठी सादर करीत आहे. कशी वाटली ते अवश्य कळवा.

Tuesday, October 10, 2023

सुरापुराण : मद्यसंस्कृतीचा एक रसिला आस्वाद (ले. अज्ञात)


कर्मठ आणि कट्टर लोक सोडले तर जगातली एकाही संस्कृतीने आणि धर्माने मद्यपानाचा निषेध केलेला नाही. देवसुद्धा सुरापान म्हणजेच मद्यपान करत असत असा वेदांमध्ये उल्लेख आहे. असे असतांनाही काही लोक उगाचच मद्याला नावे ठेवतात आणि मद्यप्रेमींकडे पाहून नाके मुरडतात. त्यांना मद्यपानातील सौंदर्य उलगडून सांगणारा आणि रसिकपणे मद्याचा आस्वाद कसा घ्यायला हवा हे शिकवणारा हा लेख आपल्याला नक्कीच आवडेल. लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले ते अवश्य कळवा. मूळ लेखकाचे नाव आपल्याला माहीत असल्यास तेही कळवा. म्हणजे त्यांच्या नावाचा उल्लेख करता येईल.