Friday, December 16, 2022

विकासवाणी अभिवाचन स्पर्धा : वर्ष 2 - माहिती (मराठी)


आपले आवडते विकासवाणी यू ट्यूब चॅनल आणि रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक अभिवाचन स्पर्धा : वर्ष 2.
स्पर्धेच्या सविस्तर माहितीचा हा व्हिडिओ अवश्य ऐका, स्वत: स्पर्धेत भाग घ्या. तुमच्या परिवारातील 18 वर्ष किंवा जास्त वयाच्या सदस्यांना भाग घ्यायला लावा. तुमच्यासारखेच वाचनाची आवड असणारे आणि चांगल्या पद्धतीने अभिवाचन करू शकणारे जे कलाकार आहेत त्यांना पाठवा आणि स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022

Thursday, December 8, 2022

प्लेटोच्या कल्पनेतील तत्वज्ञ राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (ले. श्रीनिवास...


प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.
6 डिसेंबरला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता. त्या निमित्ताने मी दोन लेखांचे अभिवाचन केले. त्यापैकी डॉ. स्वप्ना लांडे यांनी लिहिलेला एक भावपूर्ण लेख, भिंत खचली कलथून खांब गेला हा ह्याआधी आपण ऐकलात.

आज ऐकू या श्रीनिवास बेलसरे यांनी लिहिलेला प्लेटोच्या कल्पनेतील तत्वज्ञ राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा लेख. जरूर ऐका आणि कसा वाटला ते कळवा.
तुमच्या प्रतिक्रिया यू ट्यूबवर व्हिडिओखाली कमेंट करून कळवा. जर लेखक आणि अभिवाचक यांना कळवायची असेल तर त्यांचे मोबाईल क्रमांक आहेत श्रीनिवास बेलसरे 7208633003 आणि विकास शुक्ल ९८२२६५१०१०.

Wednesday, December 7, 2022

भिंत खचली कलथून खांब गेला : डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त...


प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.
आज ऐकू या डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. स्वप्ना लांडे यांनी लिहिलेला एक भावपूर्ण लेख जरूर ऐका आणि कसा वाटला ते कळवा.
तुमच्या प्रतिक्रिया यू ट्यूबवर व्हिडिओखाली कमेंट करून कळवा. जर लेखक आणि अभिवाचक यांना कळवायची असेल तर त्यांचे मोबाईल क्रमांक आहेत डॉ. स्वप्ना लांडे ७५०७५८१४४४ आणि विकास शुक्ल ९८२२६५१०१०.

Tuesday, November 29, 2022

व्हिडिओ # 480: म.फुलेंना अभिप्रेत असलेली शिक्षणपद्धती आणि आजची स्थिती (ड...


प्रिय श्रोते हो, आपण ऐकत आहात क्रांतिरत्न महाग्रंथाचे ध्वनिरूप रूपांतरण विकास बलवंत शुक्ल यांच्या दमदार आणि भारदस्त आवाजात. या ग्रंथाची मूळ संकल्पना प्रेरणा राजेश खवले ह्यांची असून श्री. राजेश खवले , श्री. विश्वनाथ शेगावकर , श्री.प्रकाश अंधारे, श्री. अशोक गेडाम ,श्री. विजय लोखंडे, श्री. राहुल तायडे , श्री अतुल दोड, श्री.प्रताप वाघमारे, श्री. विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. मुख्य संपादिका डॉ. पुष्पाताई तायडे , सहसंपादक डॉ. सतीश पावडे, डॉ.दीपक सूर्यवंशी, डॉ..चंद्रकांत सरदार व श्री. सतिश जमोदकर व श्री.प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचे संपादन केले आहे.
आज आपण ऐकणार आहोत म.फुलेंना अभिप्रेत असलेली शिक्षणपद्धती आणि आजची स्थिती (डॉ.पुष्पा सुभाष तायडे) ह्या लेखाचा दुसरा भाग

Saturday, November 26, 2022

व्हिडिओ # 477 - देव बाजाराचा भाजीपाला नाही रे - ले. श्रीनिवास बेलसरे


प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.

चित्रपट आणि चित्रपट संगीत या विषयावर अत्यंत रसिकतेने लिखाण करणारे श्री. श्रीनिवास बेलसरे यांचा एक ताजा लेख आपल्यासाठी आज सादर करीत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या काही अभंगांचा रसास्वाद करवून देणारा हा लेख आणि त्याचे अभिवाचन आपल्याला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे.
अभिप्राय आणि संपर्कासाठी मो. क्रमांक
श्रीनिवास बेलसरे - 7208633003 विकास बलवंत शुक्ल - 9822651010

व्हिडिओ # 478: म.फुलेंना अभिप्रेत असलेली शिक्षणस्थिती आणि आजची परिस्थिती...


प्रिय श्रोते हो, आपण ऐकत आहात क्रांतिरत्न महाग्रंथाचे ध्वनिरूप रूपांतरण विकास बलवंत शुक्ल यांच्या दमदार आणि भारदस्त आवाजात.
या ग्रंथाची मूळ संकल्पना प्रेरणा राजेश खवले ह्यांची असून श्री. राजेश खवले , श्री. विश्वनाथ शेगावकर , श्री.प्रकाश अंधारे, श्री. अशोक गेडाम ,श्री. विजय लोखंडे, श्री. राहुल तायडे , श्री अतुल दोड, श्री.प्रताप वाघमारे, श्री. विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. मुख्य संपादिका डॉ. पुष्पाताई तायडे , सहसंपादक डॉ. सतीश पावडे, डॉ.दीपक सूर्यवंशी, डॉ..चंद्रकांत सरदार व श्री. सतिश जमोदकर व श्री.प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचे संपादन केले आहे.
आज आपण ऐकणार आहोत म.फुलेंना अभिप्रेत असलेली शिक्षणस्थिती आणि आजची परिस्थिती (डॉ.पुष्पा सुभाष तायडे) हा लेख.

Friday, November 18, 2022

व्हिडिओ # 476 Sea to Sky Gondola Ride @ Whistler, Canada सागर ते आकाश के...


प्रिय प्रेक्षक हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.
आज आपण बघणार आहोत सागर ते आकाश ही गोंडोला उर्फ केबल कार सफर. कॅनडातील व्हॅन्कुव्हर या निसर्गरम्य शहरापासून तासाभराच्या ड्राईव्ह वर असलेल्या व्हिसलर या स्किईंग साठी आणि साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असणार्‍या गावातील पर्वताच्या शिखरापर्यंत जाणारी केबल कार सफर. 10 कि.मी लांब आणि 3000 फूट उंचीची ही केबल कार राईड खूप प्रसिद्ध आणि अविस्मरणीय अशी आहे. चारही बाजूला हिरवीगार वनराई असणारी, हिमाने आच्छादलेली पर्वत शिखरे आणि त्यातून जाणार्‍या, केबलला लटकलेल्या पाळण्यातील ही सफर चित्तथरारक असून आसपासच्या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद देणारी आहे.
एक अप्रतिम व्हिडिओ आणि सोबत रसभरीत निवेदन तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे.
व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कमेंट करून कळवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. विकासवाणी चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचे बटन सुद्धा दाबा ज्यामुळे प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळत राहील.
#seatosky #seatoskygondola #whistlerbc #vancouvercanada #vancouverbc #canadatour #vancouverattractions

Monday, November 14, 2022

व्हिडिओ # 475 कोई पास आया सवेरे सवेरे - ले. श्रीनिवास बेलसरे


प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.
चित्रपट आणि चित्रपट संगीत या विषयावर अत्यंत रसिकतेने लिखाण करणारे श्री. श्रीनिवास बेलसरे यांचा एक ताजा लेख आपल्यासाठी आज सादर करीत आहे.

हा लेख जरा हटके आहे. कारण तो गजल या विषयावर आहे.

गजल या फारसी शब्दाचा अर्थ होतो 'प्रेयसीशी केलेले संभाषण'. आपण सारेच जण गजल अत्यंत आवडीने ऐकतो. गजल जगतात आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण करणारे जगजीत आणि चित्रा सिंग हे दाम्पत्य एके काळी घराघरात माहीत होते. आजही त्यांच्या गजल ऐकल्या जातात. त्यांच्या काही गजलांचा रसास्वाद करून देणारा हा लेख आणि त्याचे अभिवाचन आपल्याला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे.
अभिप्राय आणि संपर्कासाठी मो. क्रमांक
श्रीनिवास बेलसरे - 7208633003 विकास बलवंत शुक्ल - 9822651010

Sunday, November 13, 2022

व्हिडिओ # 474 छद्म विज्ञान (ले. डॉ. स्वप्ना लांडे)


प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा  नमस्कार. 

आज ऐकू या डॉ. स्वप्ना  लांडे यांनी लिहिलेला एक अभ्यासपूर्ण  आणि  महत्वाचा मुद्दा उपस्थित करणारा लेख
 छद्म विज्ञान. 
आपल्या पूर्वजांना विज्ञान कळत होते आणि म्हणून आपल्या प्रथा आणि परंपरांमागे अंधश्रद्धा नसून विज्ञानच आहे असा सनातनी लोकांचा दावा कसा भ्रामक आहे हे दाखवून देणारा हा लेख जरूर ऐका आणि कसा वाटला ते कळवा. 

तुमच्या प्रतिक्रिया यू ट्यूबवर व्हिडिओखाली कमेंट करून कळवा. 

जर लेखक आणि अभिवाचक यांना कळवायची असेल तर त्यांचे मोबाईल क्रमांक आहेत 

डॉ. स्वप्ना लांडे ७५०७५८१४४४ आणि विकास शुक्ल ९८२२६५१०१०.

#अंधश्रद्धा  #विज्ञान  #blindfaith  #superstitions  #anis . 

Thursday, November 10, 2022

व्हिडिओ # 473 कथा - व्हिंटेज (ले. सौरभ साठे)


फेसबुक वरील लोकप्रिय लेखक आणि माझे मित्र सौरभ साठे यांनी लिहिलेली ही भावपूर्ण कथा विकासवाणीच्या रसिक प्रेक्षकांसाठी विशेषत: पन्नाशी पार केलेल्या आणि त्या वाटेवर असलेल्या जेष्ट नागरिकांसाठी सादर करीत आहे.

ही सुंदर कथा शेवटी एक अत्यंत सकारात्मक असा संदेश आपल्याला देऊन जाते. आशा आहे आपल्याला ही कथा आणि तिचे अभिवाचन नक्की आवडेल.

आपले अभिप्राय व्हिडिओखाली कमेंट करून अथवा खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून अवश्य कळवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. अभिप्राय आणि सम्पर्कासाठी मो. क्रमांक
सौरभ साठे (9322828967)
विकास बलवंत शुक्ल (9822651010)

Sunday, November 6, 2022

टिकली पुराण (कवी हेरंब कुलकर्णी) कुंकवाचा इतिहास (ले. सुलभा ब्रह्मे)


सध्या गाजत असलेल्या टिकली पुराणाच्या संदर्भात आज ऐकू या हेरंब कुलकर्णी यांची तू आणि मी ही जळजळीत उपरोधिक कविता. तसेच कुंकवाच्या प्रथेचा इतिहास जाणून घेऊ या प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि गोखले इन्स्टिट्यूटच्या माजी संचालिका स्व. सुलभा ब्रह्मे यांच्या एका लेखातून.
अभिवाचन आणि लेखनावर प्रतिक्रिया देण्यासाठी
हेरंब कुलकर्णी : 8208589195
विकास बलवंत शुक्ल : 9822651010

Thursday, November 3, 2022

Video # 471 ऐतिहासिक फोर्ट लॅन्गलीच्या अ‍ॅन्टिक दुकानाला भेट (संपूर्ण न...


व्हिडिओ # 470 मध्ये तांंत्रिक अडचणीमुळे निवेदन 5 मि. 22 सेकंदांपर्यंतच आले होते. बाकीच्या भागात ते ऐकू येत नव्हते. म्हणून हा व्हिडिओ पुन्हा संपूर्ण निवेदनासह अपलोड केला आहे.
फोर्ट लॅंन्ग्ली हे व्हॅंनकुवर शहराजवळ असलेले एक छोटेसे, टुमदार आणि अत्यंत सुंदर असे ऐतिहासिक गाव आहे. आम्ही एक पूर्ण दिवसभर या गावात होतो. मस्तपैकी भटकत होतो आणि गावाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत होतो. त्यापैकीच एक सुंदर जागा म्हणजे अ‍ॅंटिक शॉप. आपल्याकडे अशी सुंदर अशी जुन्या वस्तूंची दुकाने नसतात. चोर बाजार नावाने रस्त्यावर भरणार्‍या बाजारातच किंवा भंगारवाल्याकाडे आपल्याला अशा जुन्या पुराण्या वस्तू बघायला मिळतात. पण इकडे अशी अ‍ॅंटिक शॉप्स खूप कॉमन आहेत आणि त्यात मारलेला फेरफटका खूपच मनोरंजक ठरतो.
आशा आहे तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ असाच मनोरंजक वाटेल.
आपले प्रेम आणि आशिर्वाद असेच कायम राहू द्या.
व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.

Sunday, October 30, 2022

मी अगदी मजेत आहे

(हा एका इंग्रजी कवितेचा अनुवाद आहे. मूळ कवी कोण ते मला माहीत नाही. कविता कधी आणि कुठे वाचली ते सुद्धा आठवत नाही. पण आवडली म्हणून लगेच अनुवाद करून ठेवला होता. तो आज तुमच्यासाठी प्रसिद्ध करतोय. कसा वाटला, सांगा.)

वय बरंच झालंय तरीमी अगदी मजेत आहे ॥ ध्रु ॥

संधिवातानं मी जखडलोय
बोलताना श्वास अखडतोय
नाडी झालीय मंद आणि रक्त कोमट आहे
पण माझ्या वयाच्या मानाने मी अगदी मजेत आहे ॥ १ ॥

म्हातारपण म्हणजे मजा (असं काही लोक म्हणतात)
पण झोपताना मात्र मला काही प्रश्न पडतात
माझी काठी कोप-यात, कपात माझे दात
कान माझे ड्रॉवरमधे आणि डोळे कपाटात
झोप लागता लागता मात्र मधेच मी दचकून जाय
आणखी एखादा पार्ट माझा ठेवायचा राहिला की काय ? ॥ २ ॥

रोज सकाळी मी उठतो, मनावरची धूळ झटकतो
रोजचा ताजा पेपर सर्वात आधी उघडतो
शोकसमाचारामधे माझे नाव नसते
मी जिवंत असल्याची मज डब्बल खात्री पटते
मग वळतो किचनकडे आणि करतो भक्कम नाश्ता
कधि किंचित पापही करतो, वियाग्राची साथ असता
अगदीच टिपेत नसलं तरी गाणं लयीत आहे
माझ्या वयाच्या मानानं मी अगदी मजेत आहे ॥ ३ ॥

व्हिडिओ # 469 पाडस (ले. माणिक पुरी ) अरण्यवाचनाचा एक उत्तम नमूना


प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. 

काही दिवसांपूर्वी आपण माणिक पुरी सरांचे दोन  लेख ऐकले होते, अजगराच्या टापूतील नोंदी  आणि रातव्याचे जंगल. ते आपल्याला खूप आवडले होते. 

आज आपण ऐकणार आहोत तितकाच एक नवा आणि सुंदर लेख. शीर्षक आहे 'पाडस''.  

ऐकतांना तुम्हाला नक्कीच अरण्यवाचन विषयातील एक महान नाव 'मारुती चितमपल्ली' यांची आठवण येईल इतकी माणिक पुरी यांची शैली चित्रदर्शी आहे. 

या मालिकेत आपण माणिक पुरी सरांचे अन्य लेख सुद्धा ऐकणार आहोत. 

आजचा लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले हे जरूर कळवा. 

संपर्क : माणिक पुरी (9881967346)  
विकास शुक्ल (9822651010)

Friday, October 28, 2022

व्हिडिओ # 468 : आईचे विद्यापीठ (ले. दीपाली कात्रे) घरात कटकट करणार्‍या आ...


स्वत: एक उत्तम लेखिका आणि अभिवाचक असलेल्या दीपाली कात्रे यांनी लिहिलेला हा लेख विकासवाणीच्या रसिक श्रोते व प्रेक्षकांसाठी सादर करीत आहे.

आईचे बोलणे मुलांना कटकट न वाटता आवडेल असे कसे करता येईल याची एक मस्त युक्ती सांगणारा हा लेख आणि त्याचे अभिवाचन आपल्याला नक्की आवडेल.

आपले अभिप्राय व्हिडिओखाली कमेंट करून अथवा खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून अवश्य कळवा.
व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. अभिप्राय आणि सम्पर्कासाठी मो. क्रमांक
दीपाली कात्रे (9323340524) विकास बलवंत शुक्ल (9822651010)

Tuesday, October 25, 2022

व्हिडिओ # 467 : दीप प्रज्वलन (ले. डॉ. प्रफुल्ल मोकादम, नागपूर) एक खुसखुश...

माझे मित्र डॉ. प्रफुल्ल मोकादम, नागपूर यांनी लिहिलेला हा लेख विकासवाणीच्या रसिक प्रेक्षकांसाठी सादर करीत आहे. आपल्याला नेहमीच अनुभवाव्या लागणार्‍या या प्रसंगातील विनोद बारकाईने टिपून त्यावर मार्मिक आणि खमंग टिप्पणी करणारा हा लेख आणि त्याचे अभिवाचन आपल्याला नक्की आवडेल.
आपले अभिप्राय व्हिडिओखाली कमेंट करून अथवा खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून अवश्य कळवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. अभिप्राय आणि सम्पर्कासाठी मो. क्रमांक डॉ. प्रफुल्ल मोकादम (9822200748) विकास बलवंत शुक्ल (9822651010)

Saturday, October 22, 2022

व्हिडिओ # 466 : लव्ह यू जिंदगी (ले. प्रमोद हुलसूरकर) जेष्ट नागरिकांनी जर...


माझे मित्र प्रमोद हुलसूरकर यांनी लिहिलेला  हा लेख  विकासवाणीच्या रसिक प्रेक्षकांसाठी विशेषत: पन्नाशी पार केलेल्या आणि त्या वाटेवर असलेल्या जेष्ट नागरिकांसाठी सादर  करीत आहे.

गूढकथेसारखी सुरुवात असणारा हा लेख शेवटी एक अत्यंत सकारात्मक असा संदेश आपल्याला देऊन जातो. आशा आहे आपल्याला हा लेख आणि त्याचे अभिवाचन नक्की आवडेल. आपले अभिप्राय व्हिडिओखाली कमेंट करून अथवा खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून अवश्य कळवा. 

व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. 

अभिप्राय आणि सम्पर्कासाठी मो. क्रमांक

प्रमोद हुलसूरकर (9890924751)
विकास बलवंत शुक्ल (9822651010)

Wednesday, October 19, 2022

व्हिडिओ # 465 - मानवाचे लैंगिक वर्तन (उत्तरार्ध): पूर्वप्रसिद्धी लोकसत्त...


प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.

आज ऐकू या मानवाचे लैंगिक वर्तन (उत्तरार्ध) हा अंजली चिपलकट्टी यांनी लिहिलेला लेख..

गेल्या वर्षी लोकसत्तामध्ये 'थांग वर्तनाचा' ही अंजली यांची लेखमालिका प्रसिद्ध झाली होती आणि ती खूप गाजली. या मालिकेतील मानवाचे लैंगिक वर्तन हा लेख दोन भागात आला होता. आज ऐकू या त्याचा उत्तरार्ध

अंजली या एक कंप्यूटर इंजिनिअर असून आय टी क्षेत्रात त्यांनी बरीच वर्षे इंग्लंड अमेरिकेत वास्तव्य केले आहे. ते करिअर सोडून देऊन सध्या त्या नवीन वाटा चोखाळत आहेत. त्यातलीच काही म्हणजे वैज्ञानिक विचारसरणी रुजवणे, लेखन करणे आणि शेती करणे. आपल्याला लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा किंवा व्हिडिओखाली कमेंट करून सांगा.

विकासवाणी यू ट्यूब चॅनल आवडल्यास त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटण दाबायला विसरू नका.
चित्रात जी माकडे दिसत आहेत तीच ही लेखात उल्लेख केलेली बोनोबो माकडे. सध्या ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून फक्त कॉंगो या आफ्रिकेतील देशातच ती बघायला मिळतात. मानवाने शिकार करून करून ही प्रजाती संपवत आणली आहे.

Tuesday, October 18, 2022

व्हिडिओ # 464 - मानवाचे लैंगिक वर्तन (पूर्वार्ध): पूर्वप्रसिद्धी लोकसत्त...


प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.
आज ऐकू या मानवाचे लैंगिक वर्तन (पूर्वार्ध) हा अंजली चिपलकट्टी यांनी लिहिलेला लेख..

गेल्या वर्षी लोकसत्तामध्ये 'थांग वर्तनाचा' ही अंजली यांची लेखमालिका प्रसिद्ध झाली होती आणि ती खूप गाजली. या मालिकेतील मानवाचे लैंगिक वर्तन हा लेख दोन भागात आला होता. आज ऐकू या त्याचा पूर्वार्ध.

अंजली या एक कंप्यूटर इंजिनिअर असून आय टी क्षेत्रात त्यांनी बरीच वर्षे इंग्लंड अमेरिकेत वास्तव्य केले आहे. ते करिअर सोडून देऊन सध्या त्या नवीन वाटा चोखाळत आहेत. त्यातलीच काही म्हणजे वैज्ञानिक विचारसरणी रुजवणे, लेखन करणे आणि शेती करणे. आपल्याला लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा किंवा व्हिडिओखाली कमेंट करून सांगा. विकासवाणी यू ट्यूब चॅनल आवडल्यास त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटण दाबायला विसरू नका.
चित्रात जी माकडे दिसत आहेत तीच ही लेखात उल्लेख केलेली बोनोबो माकडे. सध्या ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून फक्त कॉंगो या आफ्रिकेतील देशातच ती बघायला मिळतात. मानवाने शिकार करून करून ही प्रजाती संपवत आणली आहे.

Friday, October 7, 2022

प्रियकराने लग्नाआधी केली सेक्सची मागणी. मग त्याला मिळालेले बाणेदार उत्तर...

प्रिय श्रोतेहो, विकास बलावंत शुक्लचा नमस्कार. समुपदेशक अपूर्व विकास हे एक मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक असून निगडी पुणे येथे असतात. ते एक उत्तम मानसशास्त्रज्ञ तर आहेतच पण त्यांचे लेखन इतके मार्मिक आणि रसाळ असते की आपल्या तोंडून आपोआप 'वाहव्वा!" बाहेर पडते. आज सादर करतोय त्यांचाच एक नवीन लेख. हा लेख मनोरंजक आणि विचार करायला लावणारा वाटेलच. शिवाय प्रत्येक तरुणाने आणि विशेषत: तरुणींनी अवश्य वाचलाच पाहिजे इतका तो महत्वाचा आहे. लग्नाआधी सेक्स हल्ली खूप कॉमन जरी झालेला दिसत असला तरी त्याचे तोटे काय आहेत हे लक्षात आणून देणारा हा लेख आपल्याला नक्कीच आवडेल. लेख कसा वाटला हे अवश्य कळवा. चॅनल आवडल्यास त्याला सबस्क्राईब करा. लेख आपल्या मित्र मंडळींसोबत अवश्य शेयर करा. संपर्क आणि अभिप्रायासाठी अपूर्व विकास (मो.क्र 77749 17184.) विकास बलवंत शुक्ल (मो.क्र. 9822651010)

Saturday, October 1, 2022

व्हिडिओ # 461 - क्रांतिरत्न : आधुनिक महाकारुणिक म. ज्योतिबा फुले (डॉ. ...


प्रिय श्रोते हो, आपण ऐकत आहात क्रांतिरत्न महाग्रंथाचे ध्वनिरूप रूपांतरण विकास बलवंत शुक्ल यांच्या दमदार आणि भारदस्त आवाजात. या ग्रंथाची मूळ संकल्पना प्रेरणा राजेश खवले ह्यांची असून श्री. राजेश खवले , श्री. विश्वनाथ शेगावकर , श्री.प्रकाश अंधारे, श्री. अशोक गेडाम ,श्री. विजय लोखंडे, श्री. राहुल तायडे , श्री अतुल दोड, श्री.प्रताप वाघमारे, श्री. विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. मुख्य संपादिका डॉ. पुष्पाताई तायडे , सहसंपादक डॉ. सतीश पावडे, डॉ.दीपक सूर्यवंशी, डॉ..चंद्रकांत सरदार व श्री. सतिश जमोदकर व श्री.प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचे संपादन केले आहे. आज आपण ऐकणार आहोत आधुनिक महाकारुणिक म. ज्योतिबा फुले (डॉ. संतोष श्रीकांत भोसले) हा लेख.

Friday, September 30, 2022

व्हिडिओ # 460 : समतेचा ६०० वर्षापूर्वीचा हुंकार: संत रोहीदास (ले. श्रीनि...



श्रीनिवास बेलसरे यांच्या खालील लेखाचे हे मी केलेले अभिवाचन असून ते आपल्याला वरील चित्रावर क्लिक केल्यावर ऐकायला मिळू शकेल. जरूर ऐका आणि कसे वाटले ते व्हिडिओ खाली आपला अभिप्राय नोंदवून मला कळवा. जर आपल्याला माझी अभिवाचने आवडत असतील तर जरूर त्यांना लाईक करा, शेअर करा आणि माझ्या विकासवाणी यू ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 

विकास बलवंत शुक्ल

समतेचा ६०० वर्षापूर्वीचा हुंकार: संत रोहीदास’
 
   संत रविदास किंवा संत नामदेव हे दोन्ही संत खरे तर हिंदू ! पण आपण जेंव्हा संत नामदेवांच्या अभंगांचा किंवा रोहीदासांच्या भजनांचा अभ्यास करतो तेंव्हा आपला शीख धर्माबद्दलचा आदर जास्तच वाढतो. या दोन्ही संतकवींना सन्मान दिला तो गुरुनानकदेवांच्या शीख धर्माने ! केवढा सन्मान ? इतका की यांच्या काव्यरचना शीखधर्माचा एकमेव धर्मग्रंथ असलेल्या पवित्र ‘गुरुग्रंथसाहेब’मध्ये समाविष्ट करण्यात आल्या. महाराष्ट्रात इथले धर्ममार्तंड जगद्गुरू तुकोबारायांना त्यांची रसाळ गाथा नदीत बुडवायची आज्ञा सोडतात तर तिकडे नामदेवांच्या रचना श्री गुरुग्रंथसाहेबात समाविष्ट होतात ! केवढा विरोधाभास !! शीख धर्माचे केवढे महानपण !
 
वर्णाश्रमधर्माच्या विषमतावादी, प्रतिगामी वास्तवात राहूनही जातीपातीपलीकडे पाहू शकणारे संत येथे झाले. तसेच इतर धर्मातीलही जे चांगले आहे ते स्वीकारणारे धर्मही या देशातच जन्माला आले. इथल्याच संतानी सर्वसमावेशक धर्म, समतावादी विचार दिले. इतरत्र असे होऊ शकले नाही. तेथे ईश्वरापर्यंत जायचा ‘एकमेव मार्ग’ म्हणजे एक विशिष्ट धर्म असे मानले जाई. इतरांना आपल्या धर्माची शिकवण देऊन त्यांचा “उद्धार” करायला शिकविले जाई. काही कट्टरपंथीय विचारधारांमुळे आज सगळे जग जीव मुठीत धरून जगते आहे. कारण माणसाचा वंश नष्ट करणे ‘धार्मिक कार्य’ मानणा-या लोकांमुळे जगभरच्या कोट्यावधी लोकांना प्रवासात, यात्रेत, हॉटेलमध्ये जाताना आधी मेटलडिटेक्टरमधून जावे लागते. विमानतळावर ३/३ तास आधी जावून सामान आणि स्वत:ला तपासून द्यावे लागते. भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ मानली जाते कारण तिने कधीही अमुक एक मार्ग, एकच धर्म श्रेष्ठ आहे असे म्हटले नाही. ईश्वरापर्यंत जायचे अनेक मार्ग असू शकतात, नव्हे, ते तसे आहेतच हा समावेशक विचार भारतीय मूळाच्या विविध धर्मांनी जगाला दिला.
 
अगदी रोजच्या बोलण्यातले उदाहरण घेऊ. “मन चंगा तो कठौती मे गंगा.” ही म्हण आपण नेहमी वापरतो. तिचा जन्म मुळात संतकवी रोहीदास यांच्या एका ओवीतला. संत रोहिदास एक उदारमतवादी संत. एकदा कोणतेतरी पर्व असल्याने लोक गंगास्नानाला निघाले होते. त्यांच्या शिष्याने त्यांनाही यायचा आग्रह केला. ते  म्हणाले, “मी नक्की आलो असतो पण मला एका ग्राहकाचे जोडे आजच द्यायचे आहेत, त्याला वेळ दिली आहे. मी स्नानाला आलो तर वेळ चुकेल आणि माझ्याकडून वचनभंगाचे पाप होईल. मग कसले पुण्य पदरी पडणार? त्यापेक्षा मन निर्मळ असेल तर माझ्या या कमंडलूतही गंगा प्रकट होईल.” आपल्या व्यवसायाशी इमान राखणे, कर्मकांडापेक्षा जास्त महत्वाचे आहे असा वस्तुपाठच त्यांनी यावेळी घालून दिला. यावर एक  दंतकथा अशीही   सांगितली जाते की अशा भक्तीने प्रसन्न होऊन गंगा त्यांच्या कमंडलूत प्रकट झाली होती !
 
रविदासजींचा जन्म  १३९८ साली काशीमध्ये झाला. एका प्रचलित ओवीत म्हटले आहे, “चौदाह सौ तेंतीसको, माघ सुदी पंधरास, दुखियोके कल्याण हित प्रकटे सिरी रविदास.” संत रविदास (उर्फ रोहिदास, उर्फ रैदास) यांचा समाजातील कुप्रथांना  विरोध होता. ते मूर्तीपूजा, तीर्थयात्रा, कर्मकांड याविरुद्ध उघड बोलत. जातीपातीची उतरंड त्यांना मान्य नव्हती. सहाशेपेक्षा अधिक वर्षांपूर्वी त्यांनी लिहून ठेवले आहे-
 
जाति-जाति में जाति हैं, जो केतन के पात।
रैदास मनुष ना जुड़ सके जब तक जाति न जात। 
 
केळ्याचे पान जसे एकातून एक निघतच राहते. त्याच्या खोडातही स्तर असतात, ते एकसंध नसते तसे जातीपातींचे आहे. जोवर त्या नष्ट होत नाहीत तोवर मानवी समाजात खरी एकता निर्माण होणार नाही. जोपर्यंत जात माणसातून निघून जात नाही तोवर माणूस माणसाशी जोडला जाणार नाही ही भविष्यवाणी त्यांनी तेंव्हा करून ठेवली आहे!  त्यांना सर्व धर्मांचेही आपसात सामंजस्य अपेक्षित आहे. दुस-या एका ओवीत ते म्हणतात –
 
“रैदास कनक और कंगन माहि जिमि अंतर कछु नाहिं।
तैसे ही अंतर नहीं हिन्दुअन तुरकन माहि। हिंदू तुरक नहीं कछु भेदा सभी मह एक रक्त और मासा।
दोऊ एकऊ दूजा नाहीं, पेख्यो सोइ रैदासा।”
 
म्हणजे सोने आणि सोन्याची बांगडी यात फरक तो काय? तसे हिंदू आणि तुर्क (म्हणजे त्यावेळच्या भाषेत मुसलमान) यांच्यात भेद नसतो. सर्वांचे रक्तमांस सारखेच ! अशी अगदी साधी हृदयाला हात घालणारी मांडणी रोहीदासांची होती. उत्तरेत काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘रैदास’ असाही होतो. त्यांना मानणारा मोठा वर्ग उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रात आहे. आजही त्यांची पदे नेहमी आपल्या कानावर पडतात. लतादीदींच्या आवाजातील हे पद त्यांचेच आहे -

प्रभु जी, तुम चंदन हम पानी,    
जाकी अँग-अँग बास समानी॥
प्रभु जी, तुम दीपक हम बाती, जाकी जोति बरै दिन राती॥”
 
चातुर्वर्ण्य नाकारताना ते म्हणतात,
 
“ब्राह्मण खतरी, वैस सूद जनम ते नाही. जो चाइह सुबरन कउ, पावै करमन माहि”
 
(अर्थात : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या वर्णाचा आधार जन्माधारित नाही. जन्माने कुणी बुद्धिवान, बलवान, धनवान असत नाही. तो आपल्या कर्माने काहीही साध्य करू शकतो. एकाच बिंदुतून सर्वांची निर्मिती होते मग ब्राम्हण आणि शुद्रात उच्चनीचतेचा भेद कसा?) तत्कालीन धर्ममार्तंडानी रोहीदासांचे ऐकले असते तर कदाचित भारताचा इतिहास बदलला असता. ते म्हणतात –
 
“जात-पांत के फेर महि, उरझी रही सभ लोग. मानुषता कूं खात हई, रविदास जात कर रोग”

(जातीपातीच्या गोंधळात सर्वजण आपापल्या जातीच्या विचारात गुंतले आहेत. त्यामुळे त्यांची विचारशक्तीच संकुचित झाली आहे. तिच्यात माणुसकीला काही जागाच शिल्लक नाही. माणुसकी आज जातिव्यवस्थेच्या रोगाने नष्ट करून टाकली  आहे.) तब्बल ६०० वर्षापूर्वी रोहीदासांनी करून ठेवलेले हे वर्णन आजही भारताला लागू पडते.
 
      अशा मर्मभेदी विचारांमुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना संत रोहीदासांचे विचार खूप भावत. त्यांनी आपले ‘द अनटचेबल’ हे पुस्तक संत रोहीदासानच अर्पण केले आहे. ‘अॅनिहीलेशन ऑफ कास्टस’ या ग्रंथातही रोहीदांसाच्या विचारांचा उल्लेख बाबासाहेबांनी केला आहे. संत कबीर हे रविदासांचे समकालीन! ते गुरुबंधूही होते. त्यांनी रविदासांचा उल्लेख “संतन मे (श्रेष्ठ) रविदास.” अशा गौरवपूर्ण शब्दात केला. रविदासांच्या साहित्यात ‘नारद भक्ती सूत्र, ‘रविदास की बानी’, आणि ‘रविदास के पद’ यांचा समावेश होतो. त्यांनी सर्वसामान्यांना समजणारी भाषा म्हणून मुद्दाम ब्रज भाषेचा उपयोग केला. त्यांच्या लेखनात अवधी, राजस्थानी, खडी बोली, उर्दू आणि फारसी शब्दांचाही वापर दिसतो. रोहीदासांची ४० पदे गुरुग्रंथसाहेबात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यांचे अध्यात्मिक प्रतिपादन होते, ‘या जगातील सर्व गोष्टी नश्वर आहेत. क्षणभंगुर आहेत. मग माणसाने आपल्या देहाचा, शक्तीचा उपयोग लोकसेवेसाठी का करू नये? राम, रहीम, कृष्ण, करीम, राघव ही सगळी एकच ईश्वराला दिलेली वेगवेगळी नावे आहेत. वेद, कुराण आणि पुराणातही एकाच ईश्वराची स्तुती आहे.
 
‘कृस्न, करीम, राम, हरि, राघव, जब लग एक न पेखा।
वेद कतेब कुरान, पुरानन, सहज एक नहिं देखा।‘
 
संत मीराबाईंसुद्धा त्यांच्या वाणीने प्रभावित होऊन त्यांच्या शिष्या झाल्या असे म्हणतात. त्यांच्या शिकवणुकीने प्रभावित होऊन सिकंदर लोदीने त्यांना दिल्लीस येण्याची विनंती केली होती.
 
     संपूर्ण नम्रतेचा पुरस्कार करणा-या या संताने अहंकाराचे सुंदर वर्णन केले आहे – ‘मुंगी साखरेचा एकेक दाणा गोळा करून मधुर अन्नाचा आस्वाद घेते. हत्ती तिच्या कितीतरी पट मोठा असून कधीही साखर खाऊ शकत नाही. त्याचे मोठेपणच  त्याच्या जीवनातील माधुर्याच्या आड येते. ईश्वरभक्तीचा आनंद घ्यायला अंगी नम्रता हवी. ज्याला अहंकार आहे तो ईश्वरभक्तीचा आनंद घेऊ शकत नाही.’ असे संत रोहिदासांचे प्रतिपादन होते.  या दृष्ट्या ईश्वरभक्ताला त्रिवार वंदन ! 
***
©️श्रीनिवास बेलसरे. 9969921283 
 
(वरील लेख दै प्रहारमध्ये 2016 ला प्रकाशित झालेला आहे.  त्यामुळे आवडल्यास नावानिशी शेयर करावा. 🙏😊)