अनील अवचट हे माझे अत्यंत आवडते लेखक. आज त्यांचा एक लेख सादर करतोय ज्यात त्यांनी पुण्यातील एक अत्यंत लोकप्रिय जागा आणि कारागिरांची पंढरी मानल्या जाणार्या बोहरी आळीचे आपल्या साध्या, प्रांजळ आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीत खुमासदार वर्णन केले आहे. पुण्यात राहणार्यांना तर ते आवडेलच पण ज्यांनी अद्याप ह्या जागी भेट दिली नसेल त्यांनाही तिथे एक चक्कर मारावीशी वाटेल.
अभिवाचन आवडल्यास जरूर आपले अभिप्राय व्हिडिओखाली नोंदवा.
Saturday, November 25, 2023
Sunday, November 19, 2023
व्हिडिओ # 629 : दृष्टीचोर (ले. डॉ. प्रफुल्ल मोकादम, नागपूर) एक माहितीपू...
माझे मित्र डॉ. प्रफुल्ल मोकादम, (नागपूर) हे प्रख्यात नेत्ररोगतज्ञ आहेत. यांनी लिहिलेली ही कथा यंदाच्या तरुण भारत दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. पन्नाशी गाठल्यानंतर आपली दृष्टी म्हणजेच नजर चोरू शकणार्या आणि तीही आपल्या नकळत, अशा एका 'दृष्टीचोर' आजाराबद्दल त्यांनी अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत या कथेत सांगितले आहे.
ज्यांनी पन्नाशी गाठली आहे किंवा ज्यांच्या घरात पन्नाशीपुढची ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी ही कथा नक्कीच ऐकायला हवी आणि आपल्या मित्र व नातेवाइकांना ऐकवायला हवी.
आशा आहे कथा ऐकल्यावर आपण सावध व्हाल आणि त्यातील सल्ला अमलात आणाल.
आपले अभिप्राय व्हिडिओखाली कमेंट करून अथवा खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून अवश्य कळवा.
अभिप्राय आणि सम्पर्कासाठी मो. क्रमांक
डॉ. प्रफुल्ल मोकादम (9822200748)
विकास बलवंत शुक्ल (9822651010)
Monday, October 30, 2023
व्हिडिओ # 628 - तथास्तु (ले. गुरुनाथ तेंडुलकर)
गुरुनाथ तेंडुलकर यांचा रविवारच्या प्रहारच्या अंकात (29 आक्टोबर 2023) प्रसिद्ध झालेला एक प्रेरणादायी लेख सादर करीत आहे. यापूर्वी मी गुरुनाथ तेंडुलकरांचा 'वेळ मिळत नाही' आणि 'माझा काय संबंध? हे लेख वाचले होते, हे आपल्याला आठवतच असेल. जर आपण ते लेख ऐकले नसतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी मी दिली आहे. त्या लेखाप्रमाणेच हाही लेख तुम्हाला आवडेल याची खातरी आहे. लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा.
Monday, October 23, 2023
व्हिडिओ # 627 - माझा काय संबंध ? (ले. गुरुनाथ तेंडुलकर)
गुरुनाथ तेंडुलकर यांचा रविवारच्या प्रहारच्या अंकात (23 आक्टोबर 2023) प्रसिद्ध झालेला एक प्रेरणादायी लेख सादर करीत आहे. यापूर्वी मी गुरुनाथ तेंडुलकरांचा 'वेळ मिळत नाही' हा लेख वाचला होता, हे आपल्याला आठवतच असेल. जर आपण तो लेख ऐकला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी मी दिली आहे. त्या लेखाप्रमाणेच हाही लेख तुम्हाला आवडेल याची खातरी आहे. लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा.
Friday, October 20, 2023
डॉ. सीताराम जाधव (कन्नड) यांच्या सफरचंद बाग आणि गोशाळेस भेट
आमच्या चाळीसगावाजवळील कन्नड येथील एक अभ्यासू आणि प्रगतीशील शेतकरी डॉ. सीताराम जाधव यांनी खडकाळ व बरड जमिनीवर चक्क सफरचंदांची लागवड केली आहे. ती बघण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो त्याचा हा व्हिडिओ. आम्ही गेलो तेंव्हा डॉ. जाधव यांच्याकडे म.प्र. तून सुप्रसिद्ध कृषि तज्ञ ताराचंद बेलजी हे आलेले होते आणि त्यांची कार्यशाळा आयोजित केलेली होती. त्यामुळे डॉ. जाधव यांच्याशी मोजकेच संभाषण होवू शकले. तरी पुढे कधीतरी पुन्हा आम्ही जाऊ आणि त्यांच्याशी सविस्तर बोलून त्यांच्या प्रयोगाची माहिती घेऊ. तोवर हा एक ट्रेलर आहे असे समजावे. #applegarden #kannad #farming #applefarming #goshala #cowfarming #drseetaramjadhavkannad #drjadhavkannad
व्हिडिओ # 625 डॉ. सीताराम जाधव यांच्या सफरचंद बाग आणि गोशाळेस भेट
आमच्या चाळीसगावाजवळील कन्नड येथील एक अभ्यासू आणि प्रगतीशील शेतकरी डॉ. सीताराम जाधव यांनी खडकाळ व बरड जमिनीवर चक्क सफरचंदांची लागवड केली आहे. ती बघण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो त्याचा हा व्हिडिओ. आम्ही गेलो तेंव्हा डॉ. जाधव यांच्याकडे म.प्र. तून सुप्रसिद्ध कृषि तज्ञ ताराचंद बेलजी हे आलेले होते आणि त्यांची कार्यशाळा आयोजित केलेली होती. त्यामुळे डॉ. जाधव यांच्याशी मोजकेच संभाषण होवू शकले. तरी पुढे कधीतरी पुन्हा आम्ही जाऊ आणि त्यांच्याशी सविस्तर बोलून त्यांच्या प्रयोगाची माहिती घेऊ. तोवर हा एक ट्रेलर आहे असे समजावे.
Tuesday, October 17, 2023
व्हिडिओ # 624 : वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा (ले. श्रीकांत बोजेवार उर्...
मराठीतले एक नामवंत लेखक, कवी, समीक्षक आणि पत्रकार श्रीकांत बोजेवार उर्फ तंबी दुराई यांची ही बोचरी आणि उपरोधिक कविता. 15 आक्टोबर 2023 च्या म.टा. च्या संवाद पुरवणीत प्रसिद्ध झालेली. हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो. मात्र पुस्तके, वाचन, लेखन या विश्वात सध्या काय परिस्थिती आहे याची सद्यस्थिती आपल्या टोकदार शैलीत आपल्याला दाखवून देणारी श्रीकांतजींची ही कविता त्यांच्या आणि म.टा. च्या सौजन्याने आपल्यासाठी सादर करीत आहे. कशी वाटली ते अवश्य कळवा.
Subscribe to:
Posts (Atom)
