Saturday, January 7, 2023

व्हिडिओ # 490 सनफेस्ट : सूर्यफुलांच्या शेताला भेट Sunfest : Visit to Sun...


Visit to Sunflower Farm in Canada  कॅनडातील सूर्यफुलांच्या शेताला भेट 

गेल्या वर्षी मी जुलै ते सप्टेंबर असा  काळ कॅनडात होतो. तेंव्हा एका सुट्टीच्या दिवशी आम्ही व्हॅनकुव्हर पासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या एका सूर्यफुलांच्या ऑर्ग़ेनिक फार्मला भेट दिली. तिथे दर वर्षी सनफेस्ट या नावाचा सूर्यफुलांचा उत्सव आयोजित केला जातो आणि त्याला खूप लोक भेट देत असतात. त्या आमच्या भेटीचा हा रंगतदार व्हिडिओ माझ्या निवेदनासह खास विकासवाणीच्या प्रेक्षकांसाठी सादर करीत आहे. 

आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. कसा वाटला हे व्हिडिओ खाली कमेंट करून अवश्य कळवा. 

चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसल्यास लगेच करा. व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीसोबत नक्की शेयर करा.

Friday, December 16, 2022

विकासवाणी अभिवाचन स्पर्धा : वर्ष 2 - माहिती (मराठी)


आपले आवडते विकासवाणी यू ट्यूब चॅनल आणि रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक अभिवाचन स्पर्धा : वर्ष 2.
स्पर्धेच्या सविस्तर माहितीचा हा व्हिडिओ अवश्य ऐका, स्वत: स्पर्धेत भाग घ्या. तुमच्या परिवारातील 18 वर्ष किंवा जास्त वयाच्या सदस्यांना भाग घ्यायला लावा. तुमच्यासारखेच वाचनाची आवड असणारे आणि चांगल्या पद्धतीने अभिवाचन करू शकणारे जे कलाकार आहेत त्यांना पाठवा आणि स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022

Thursday, December 8, 2022

प्लेटोच्या कल्पनेतील तत्वज्ञ राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (ले. श्रीनिवास...


प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.
6 डिसेंबरला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता. त्या निमित्ताने मी दोन लेखांचे अभिवाचन केले. त्यापैकी डॉ. स्वप्ना लांडे यांनी लिहिलेला एक भावपूर्ण लेख, भिंत खचली कलथून खांब गेला हा ह्याआधी आपण ऐकलात.

आज ऐकू या श्रीनिवास बेलसरे यांनी लिहिलेला प्लेटोच्या कल्पनेतील तत्वज्ञ राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा लेख. जरूर ऐका आणि कसा वाटला ते कळवा.
तुमच्या प्रतिक्रिया यू ट्यूबवर व्हिडिओखाली कमेंट करून कळवा. जर लेखक आणि अभिवाचक यांना कळवायची असेल तर त्यांचे मोबाईल क्रमांक आहेत श्रीनिवास बेलसरे 7208633003 आणि विकास शुक्ल ९८२२६५१०१०.

Wednesday, December 7, 2022

भिंत खचली कलथून खांब गेला : डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त...


प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.
आज ऐकू या डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. स्वप्ना लांडे यांनी लिहिलेला एक भावपूर्ण लेख जरूर ऐका आणि कसा वाटला ते कळवा.
तुमच्या प्रतिक्रिया यू ट्यूबवर व्हिडिओखाली कमेंट करून कळवा. जर लेखक आणि अभिवाचक यांना कळवायची असेल तर त्यांचे मोबाईल क्रमांक आहेत डॉ. स्वप्ना लांडे ७५०७५८१४४४ आणि विकास शुक्ल ९८२२६५१०१०.

Tuesday, November 29, 2022

व्हिडिओ # 480: म.फुलेंना अभिप्रेत असलेली शिक्षणपद्धती आणि आजची स्थिती (ड...


प्रिय श्रोते हो, आपण ऐकत आहात क्रांतिरत्न महाग्रंथाचे ध्वनिरूप रूपांतरण विकास बलवंत शुक्ल यांच्या दमदार आणि भारदस्त आवाजात. या ग्रंथाची मूळ संकल्पना प्रेरणा राजेश खवले ह्यांची असून श्री. राजेश खवले , श्री. विश्वनाथ शेगावकर , श्री.प्रकाश अंधारे, श्री. अशोक गेडाम ,श्री. विजय लोखंडे, श्री. राहुल तायडे , श्री अतुल दोड, श्री.प्रताप वाघमारे, श्री. विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. मुख्य संपादिका डॉ. पुष्पाताई तायडे , सहसंपादक डॉ. सतीश पावडे, डॉ.दीपक सूर्यवंशी, डॉ..चंद्रकांत सरदार व श्री. सतिश जमोदकर व श्री.प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचे संपादन केले आहे.
आज आपण ऐकणार आहोत म.फुलेंना अभिप्रेत असलेली शिक्षणपद्धती आणि आजची स्थिती (डॉ.पुष्पा सुभाष तायडे) ह्या लेखाचा दुसरा भाग

Saturday, November 26, 2022

व्हिडिओ # 477 - देव बाजाराचा भाजीपाला नाही रे - ले. श्रीनिवास बेलसरे


प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.

चित्रपट आणि चित्रपट संगीत या विषयावर अत्यंत रसिकतेने लिखाण करणारे श्री. श्रीनिवास बेलसरे यांचा एक ताजा लेख आपल्यासाठी आज सादर करीत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या काही अभंगांचा रसास्वाद करवून देणारा हा लेख आणि त्याचे अभिवाचन आपल्याला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे.
अभिप्राय आणि संपर्कासाठी मो. क्रमांक
श्रीनिवास बेलसरे - 7208633003 विकास बलवंत शुक्ल - 9822651010

व्हिडिओ # 478: म.फुलेंना अभिप्रेत असलेली शिक्षणस्थिती आणि आजची परिस्थिती...


प्रिय श्रोते हो, आपण ऐकत आहात क्रांतिरत्न महाग्रंथाचे ध्वनिरूप रूपांतरण विकास बलवंत शुक्ल यांच्या दमदार आणि भारदस्त आवाजात.
या ग्रंथाची मूळ संकल्पना प्रेरणा राजेश खवले ह्यांची असून श्री. राजेश खवले , श्री. विश्वनाथ शेगावकर , श्री.प्रकाश अंधारे, श्री. अशोक गेडाम ,श्री. विजय लोखंडे, श्री. राहुल तायडे , श्री अतुल दोड, श्री.प्रताप वाघमारे, श्री. विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. मुख्य संपादिका डॉ. पुष्पाताई तायडे , सहसंपादक डॉ. सतीश पावडे, डॉ.दीपक सूर्यवंशी, डॉ..चंद्रकांत सरदार व श्री. सतिश जमोदकर व श्री.प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचे संपादन केले आहे.
आज आपण ऐकणार आहोत म.फुलेंना अभिप्रेत असलेली शिक्षणस्थिती आणि आजची परिस्थिती (डॉ.पुष्पा सुभाष तायडे) हा लेख.