Monday, October 22, 2007

आमची सिक्कीम दार्जिलिंग सफर - भाग १

दि. ११ मे शुक्रवार रोजी सिक्कीम दार्जिलिंग यात्रेसाठी आम्ही घराबाहेर पडलो. त्याआधी सुमारे २ महिन्यांपासून तयारी सुरू होती. इंटरनेटवरून, पुस्तके, मासिके, लेख इ. वरून माहिती काढणे; जाउन आलेल्या मंडळींना त्यांचे अनुभव विचारणे, केसरी - प्रसन्न टूर्स इ. कडे चौकशा करणे असं चाललं होतं. पण तरीही समाधानकारक अशी माहिती व मार्गदर्शन कुठूनच मिळत नव्हतं. yatra.com, cleartrip या वेब साइटस वरूनही चौकशी केली होती. सर्वजण वेगवेगळी बजेटसदेत होते. पुण्याला वासंती घैसास या प्रवास विषयक सल्ला व मार्गदर्शन देणा-या लेखिका आहेत. त्यांच्याशी सुद्धा फोनवरून बोललो. त्यांनी मे महिन्यात त्या प्रदेशात पाउस असतो असे सांगितल्याने जरा धाकधुक वाटू लागली. पण ठरलेल्या तारखा सर्व दृष्टीने सोयिस्कर असल्याने त्यात बदल न करता AC III Tier ची जाण्या येण्याची तिकिटे काढून घेतली. आता प्रश्न आला हॉटेलच्या बुकिंगचा. त्यासाठी Rotary ची मदत घ्यायचे ठरवले. Rotary च्या वेबसाइटवरून दार्जिलिंग, सिक्कीम, सिलिगुडी इ. ठिकाणच्या रोटरी क्लबांच्या पदाधिका-यांचे फोन नंबर मिळवून त्यांना sms केले. Rotary Club of Siligudiच्या In coming President रो. डॉ. इकबाल यांचा रिप्लाय आला. त्यांना ई मेल करून विनंती केली. त्यांनी कळवलं की R.C. of Darjiling चा In coming President रो. ताशी हा स्वत:च Hotel Seven Seventeen चा मालक आहे. त्याचा फोन नं त्यांनी दिला. त्याच्याशी फोन वर बोललो. ई मेल करून तारखा कळवल्या आणि एडवान्स म्हणून UTI Bank च्या जळगाव शाखेत ५००० रू. जमा सुद्धा केले. त्यानुसार सावकाशपणे २ दिवस गांतोक (Hotel Chumbi Residency), २ दिवस पेलिंग (Hotel Sonamchen) आणि ३ दिवस दार्जिलिंग (Hotel Seven Seventeen) असे बुकिंग रो. ताशीने करून ई मेल द्वारा कळवले. येताना कोलकाताला २ दिवस थांबायचे असल्याने महाराष्ट्र मंडळात फोन करून बुकिंग करून ठेवले. ५०० रू.ची मनी ओर्डर सुद्धा करून ठेवली. पण कोलकाताला खूप उकाडा असल्यास AC Hotel मधे जाण्याची पण तयारा राहू दिली. अशी सर्व तयारी झाल्याने प्रवासाचे काही फारसे टेन्शन नव्हते. पण तरीही सामान गोळा करणे, काय घ्यावे काय नको याचा शेवटच्या क्षणापर्यन्त गोंधळ, खाण्याचे पदार्थ काय काय घ्यावे याची शेवटच्या क्षणापर्यन्त सुरू असलेली तयारी. अनीकाची बॅग भरणे तर महिनाभर सुरू होते. गंमत म्हणजे माझ्यासाठी पुण्याच्या मॉलमधून जे कपडे खास या ट्रिपसाठी आणले होते त्यातल्या ट्राउजर्स मला खूप घट्ट होते होत्या. त्यामुळे त्या रद्द झाल्या आणि पॅण्ट शर्ट घ्यावे लागले. तरीही बायकोने इथल्या दुकानातून एक खाकी रंगाची कार्गो आणलीच.

No comments: